सूर्यमाला (SOLAR SYSTEM)

रात्री निरभ्र आकाशाकडे पाहिले असता आपल्याला अनेक चांदण्या दिसतात. या चांदण्यांकडे निरखून पाहिले असता काही चांदण्या लुकलुकताना दिसतात तर काही लुकलुकताना दिसत नाहीत. ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. ते स्वयंप्रकाशित असतात. ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. ग्रह स्वयंप्रकाशित नसतात. हे ग्रह स्वतःभोवती व तार्याभोवती फिरतात. ग्रह व ताऱ्यांशीवाय अनेक वस्तु आकाशात आहेत. आकाशातील या सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात. अवकाशातील खगोलीय वस्तू ग्रह (PLANET): अंतराळामधील एक पिंड जो सूर्य आणि इतर ताऱ्यांभोवती भ्रमण करतो त्याला ग्रह म्हणतात. ग्रहांना स्वतःचा कोणताही प्रकाश नसतो परंतु सूर्याचा प्रकाश प्रतिबिंबित करतात. पृथ्वीवरून फक्त पहिले पाच ग्रह उघड्या डोळ्यांनी दिसतात: बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनि. इतर दोन: युरेनस आणि नेपच्यूनचा शोध दुर्बिणीचा शोध लागल्यावरच लागला. आपल्या सूर्यमालेत, खगोलशास्त्रज्ञ अनेकदा ग्रहांना दोन गटांमध्ये विभागतात - अंतर्गत ग्रह आणि बाह्य ग्रह. आतील ग्रह बाह्य ग्रह आतील ग्रह हे असे ग्रह आहेत ज्यांची कक्षा सूर्य आणि लघ...