सूर्यमाला (SOLAR SYSTEM)
अवकाशातील खगोलीय वस्तू
ग्रह (PLANET):
- अंतराळामधील एक पिंड जो सूर्य आणि इतर ताऱ्यांभोवती भ्रमण करतो त्याला ग्रह म्हणतात.
- ग्रहांना स्वतःचा कोणताही प्रकाश नसतो परंतु सूर्याचा प्रकाश प्रतिबिंबित करतात.
- पृथ्वीवरून फक्त पहिले पाच ग्रह उघड्या डोळ्यांनी दिसतात: बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनि. इतर दोन: युरेनस आणि नेपच्यूनचा शोध दुर्बिणीचा शोध लागल्यावरच लागला.
आपल्या सूर्यमालेत, खगोलशास्त्रज्ञ अनेकदा ग्रहांना दोन गटांमध्ये विभागतात - अंतर्गत ग्रह आणि बाह्य ग्रह.
आतील ग्रह | बाह्य ग्रह |
आतील ग्रह हे असे ग्रह आहेत ज्यांची कक्षा सूर्य आणि लघुग्रहांच्या पट्ट्यामध्ये असते | बाह्य ग्रह हे ग्रह आहेत ज्यांच्या कक्षा लघुग्रहाच्या पट्ट्याच्या पलीकडे असतात |
आतील ग्रह हे लहान ग्रह आहेत जे मुख्यतः खडकाचे बनलेले असतात | बाह्य ग्रह बहुतेक मोठे आणि वायूचे बनलेले असतात |
आतील ग्रहांना खूप कमी चंद्र असतात | बाहेरील ग्रहांना भरपूर चंद्र असतात |
आतील ग्रहांचा सूर्याभोवती प्रदक्षिणा कालावधी कमी असतो | बाह्य ग्रहांचा सूर्याभोवती प्रदक्षिणा जास्त कालावधी असतो |
आतील ग्रहांची घनता जास्त असते | बाहेरील ग्रहांची घनता कमी असते |
उपग्रह (SATELLITE):
काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणतात. उपग्रहांना ही ताऱ्यापासून प्रकाश मिळतो. उदाहरणार्थ चंद्र.
बटुग्रह(DWARF PLANET):
International Astronomical Union (IAU) च्या नुसार बटूग्रह कोणाला म्हटले जाते
- ती खगोलीय वस्तू सूर्याभोवती प्रदक्षिणा मारत असावी.
- त्या खगोलीय वस्तूचे वस्तुमान कमीत कमी इतके असावे की ज्यायोगे तिचा आकार गुरुत्वाकर्षणामुळे गोलाकार (spherical) व्हावा.
- त्या खगोलीय वस्तूने आपल्या कक्षेजवळील भाग साफ केलेला असावा. याचा अर्थ असा की तिच्या कक्षेजवळील अंतराळातील लहान वस्तू तिच्या गुरुत्वाकर्षणाने तिच्यामध्ये विलीन झाल्या असाव्यात. उदा. प्लुटो एरिस
लघुग्रह(ASTEROID):
मंगळ व गुरू यांच्या दरम्यान असंख्य लहान-लहान खगोलीय वस्तूंचा पट्टा आहे या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात.
धूमकेतू(COMET):
धूमकेतू अति लंबगोलाकार कक्षेत सूर्याभोवती फिरतो. धूमकेतूमध्ये कार्बन डाय-ऑक्साइड, मिथेन, पाणी आणि बरेच क्षार असतात. धूमकेतू सूर्याजवळून जात असताना त्याला शेपटीसारखा आकार दिसतो सूर्याच्या उष्णतेमुळे त्यातील पदार्थांची वाफ होते व शेपटी सारखा आकार दिसतो. ही शेपटी कायम सूर्याच्या विरुद्ध दिशेला असते. उदाहरणार्थ हॅलेचा धूमकेतू
उल्का(METEOROID):
धूमकेतूचे अवशिष्ट तुकडे म्हणजे उल्का. जेव्हा उल्का पृथ्वी कडे आकर्षिला जातो तेव्हा पृथ्वीच्या वातावरणातून जाताना त्यांचे हवेशी घर्षण होऊन तो तापतो व काही क्षण आकाशात चमकती रेषा उमटवीत मार्ग आक्रमून दिसेनासा होतो. या आविष्काराला उल्का पडणे म्हणतात. अशाच उल्कापात आतून लोणार सरोवराची निर्मिती झाली आहे.
सूर्यमाला SOLAR SYSTEM
- सूर्यमालेत आठ ग्रह आहेत हे ग्रह सूर्याभोवती व स्वतःभोवती एका विशिष्ट कक्षेत फिरतात ग्रहांची सूर्यापासून अनुक्रमे नावे बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरू शनी युरेनस नेपच्यून.
- बुध हा सगळ्यात लहान व सर्वात जलद गतीने परिभ्रमण करतो
- बुध ते पृथ्वी हे ग्रह घनरूप आहेत तर गुरु ते नेपच्यून हे ग्रह वायूरूप वायूचे गोळे आहेत.
- शुक्राला अर्थ क्वीन म्हणतात त्याचे आकारमान वजन आणि वस्तुमान सारखेच आहे.
- मंगळ या ग्रहावर पृथ्वी नंतर जीवन असण्याची शक्यता आहे.
- युरेनस घड्याळाच्या दिशेने फिरतो पूर्वेकडून पश्चिमेकडे
अवकाश: INTERSTELLAR
ग्रहतारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश यालाच अंतराळ म्हणतात.
उत्पत्तिचे सिद्धांत THEORIES OF ORIGIN OF THE EARTH
- The gaseous hypothesis of Kant
- Nebular hypothesis of Laplace
- Planetesimal hypothesis of Chamberlin
- Tidal theory of Jean and Jeffery
- Binary Star Hypothesis of Russel
- Supernova hypothesis of Hoyle
- The interstellar hypothesis of Schmidt
- Big bang theory by Georges Lemaître
BIG BANG THEORY BY GEORGES LEMAÎTRE
बिग बँग सिद्धांताची कल्पना सर्वप्रथम Georges Lemaître यांनी 1920 मध्ये दिली होती आणि हळूहळू अनेक शास्त्रज्ञांनी त्यात योगदान दिले. परंतु Gamenov (1970 च्या दशकात) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
या सिद्धांतानुसार, विश्वातील प्रत्येक गोष्ट 15 अब्ज वर्षांपूर्वी एकलता म्हणून ओळखल्या जाणार्या एका बिंदूपासून उदयास आली आहे.
आकाशगंगा एकमेकांपासून दूर सरकल्या कारण त्यांच्यामधील रिकामी जागा विस्तारली.
विश्वाचा विस्तार अतिशय उच्च घनता आणि उच्च-तापमान स्थितीतून झाला.
१३-१५ अब्ज वर्षांपूर्वी एक मोठा वैश्विक स्फोट झाला ज्यातून विश्वातील सर्व पदार्थ बाहेर फेकले गेले आणि कालांतराने तारे, सौर यंत्रणा आणि खगोलीय पिंडांची निर्मिती झाली.
Comments
Post a Comment