Posts

Showing posts from 2021

धर्म आणि विज्ञान

         धर्म आणि विज्ञान   लंडनच्या बसेसवर 2009 मध्ये मोठ्या जाहिराती झळकवण्यात आल्या. जाहिरात अशी होती ‘ There is probably no God now stop worrying and enjoy your life ’ म्हणजे ‘ बहुतेक देव नाही त्यामुळे काळजी सोडा आणि मनसोक्त जगा. ’ लंडन मध्ये घडले ते आपल्या देशात घडलं असतं तर ? लोकांची प्रतिक्रिया काय आली असती ? जळी , स्थळी , काष्टी , पाषाणी देव शोधणाऱ्या संस्कृतीत देवाचं अस्तित्व नाकारणारा विचार रुचला असता? देव आणि धर्म ह्या दोन अतूट गोष्टी आहेत. देवा शिवाय धर्म नाही आणि धर्मा शिवाय देव. कोणत्या देवाची पूजा करतो त्यावरून त्याचा धर्म ठरतो   जसं मुस्लिम अल्लाची, ख्रिश्चन येशू ची आणि हिंदू तर अनेक देविदेवतांची आराधना करतात . पण ज्यावेळी देवाचे अस्तित्व नाकारल्या जाते त्यावेळी धर्म आपोआप नाहीसा होतो . त्यामुळे धर्म हा मानवी मनाला कोणत्याही गोष्टीवर पुराव्याशिवाय विश्वास ठेवायला शिकवतो . जे मूळ मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहे. विज्ञानवाद हा मानवाचा मूळ स्वभाव आहे. देव कल्पनेचा शोधही यातूनच लागला. आदिमानवाला निसर्गात घडणाऱ्या घटनांचे योग्...

हरहुन्नरी व्यक्ती P L deshpande

  हरहुन्नरी व्यक्ती P L deshpande ताळेबंदी आहे , त्यामुळे   घरी रहा सुरक्षित रहा   या तत्वाचे पालन करत काय करायचे तर घरात असलेली पुस्तके वाचायला सुरुवात केली. मग हातात घेतल ते अनेक प्रांतात स्व‍च्छंद संचार करणाऱ्या पु. ल. देशपांडे यांचे  ‘ मैत्र ’  हे पुस्तक. या मध्ये पु. लं. च्या पूर्व प्रकाशित निवडक लेखांचा संग्रह आहे.   या पुस्तकातील लेख फार उत्तम आहेत. मग ते ‘हमीद : एक श्रेष्ठ प्रबोधनकार’ असो की ‘सखे-सोबती गेले पुढती’ असो   वा इतर. या पुस्तकातील सर्व व्यक्तिरेखा ह्या अत्यंत उत्तम रीतीने मांडल्या असून या व्यक्तिरेखांची स्वभाववैशिष्ट्ये ,  गुण ,  त्यांच्या कलेची महती ,  कामावरील- साहित्य-कलेवरील श्रद्धा यांचा वेधही पुलंनी घेतला आहे.   ह्या मध्ये ‘शाहू महाराज : एक धिप्पाड माणूस’ हा लेख मला   विशेष आवडला. या लेखातील वर्णन आजही तितकेच तंतोतंत लागू पडते. शाहू महाराज हे आदर्श राजा तर होते पण व्यक्ति म्हणून त्यांचे मोठेपण यातून मला कळले.         एक आदर्श राजा कसा असावा हे छत्रपती शाहू महाराज ,...