धर्म आणि विज्ञान
धर्म आणि विज्ञान
लंडनच्या बसेसवर 2009 मध्ये
मोठ्या जाहिराती झळकवण्यात आल्या. जाहिरात अशी
होती ‘There is probably no God now stop worrying and enjoy your
life’ म्हणजे ‘बहुतेक देव नाही
त्यामुळे काळजी सोडा आणि मनसोक्त जगा.’ लंडन मध्ये घडले ते आपल्या देशात घडलं असतं तर? लोकांची प्रतिक्रिया
काय आली असती? जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी देव शोधणाऱ्या संस्कृतीत देवाचं अस्तित्व नाकारणारा विचार
रुचला असता?
देव आणि धर्म ह्या दोन अतूट
गोष्टी आहेत. देवा शिवाय धर्म नाही आणि धर्मा शिवाय देव. कोणत्या देवाची पूजा करतो
त्यावरून त्याचा धर्म ठरतो जसं मुस्लिम अल्लाची,
ख्रिश्चन येशू ची आणि हिंदू तर अनेक देविदेवतांची
आराधना करतात. पण ज्यावेळी देवाचे
अस्तित्व नाकारल्या जाते त्यावेळी धर्म आपोआप नाहीसा होतो. त्यामुळे धर्म
हा मानवी मनाला कोणत्याही गोष्टीवर पुराव्याशिवाय विश्वास ठेवायला शिकवतो. जे मूळ
मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहे. विज्ञानवाद हा मानवाचा मूळ स्वभाव आहे. देव कल्पनेचा शोधही
यातूनच लागला. आदिमानवाला निसर्गात घडणाऱ्या घटनांचे योग्य ज्ञान नसल्यामुळे, त्यामागचा कार्यकारणभाव लक्षात न आल्यामुळे देव या
संकल्पनेचा जन्म झाला. पण जेव्हा ह्या गोष्टी का घडतात, त्यातलं विज्ञान
त्यांना लक्षात आल्यावर त्यातून देवत्व निघून गेला. असंच जर प्रत्येक गोष्टीतील
देवत्व निघून गेलं तर धर्मपीठ काय करेल? धर्मपीठद्वारे अधिराज्य
गाजवणारे मूलतत्त्ववादी काय करतील? आज पर्यंत
धर्मपीठने प्रेमापेक्षा द्वेष पसरवण्याचे काम जास्त केली आहे. धर्म हेच हिंसेचे
मुख्य कारण आहे. विश्वास नसेल तर इतिहास वाचा बघा जेवढा संहार धर्माच्या नावाने
झाला तेवढा कुठे झाला नाही. क्रूस युद्ध जे 1095 ते 1291 मध्ये ईसाई आणि मुस्लिम
धर्मामध्ये झाले. यामध्ये लाखो लोकांचा बळी गेला. धर्म
वर्चस्वाच्या नावाखाली झालेले हे एक मोठे युद्ध जे जवळपास तीनशे वर्षे चालेल. दुसऱ्या
महायुद्धात हिटलरने केलेली ज्यू धर्मियांचा संहार. असे अनेक उदाहरणे आहेत.
विज्ञान आणि धर्म एकमेकांचे विरोधक आहेत. विज्ञान हे पुरावा मागत तर धर्मात पुरावा मागणे हे
सगळ्यात मोठे पाप. त्यामुळेच विज्ञानवादी विचारांचा गळा दाबण्याचे काम धर्म कायम
करते. मग ते चार्वक असो की गॅलिलिओ की इतर कोणी. विज्ञानवादी
आणि धर्मवादी यामध्ये एक फरक आहे विज्ञानवादी अतिरेकी विचाराचे नसतात. मी सांगतो
तेच सत्य हा त्यांचा स्वभाव धर्म नसतो. विज्ञान नव्या विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या
प्रकाशात आपल्या मतांमध्ये सुधारणा करत असतो. धर्मामध्ये ते शक्य नाही. मजेची गोष्ट ही आहे की मूलतत्ववादी हयच विज्ञानाचा हात
धरून आपल्या विचारांचा प्रसार करतात.
वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल
असलेली कमालीची उदासीनता हेच या दैववादेच मुख्य कारण आहे. डार्विनचा उत्पत्तिचा
सिद्धांत जवळपास शाळा शिकलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहित असेल. परंतु तरीही या
पृथ्वीची उत्पत्ति यावरील जीवसृष्टी देवाने निर्माण केली या गोष्टीवर कितीतरी
लोकांचा आजपण दृढ विश्वास आहे. दुर्दैवाची
गोष्ट ही की यात काही डार्विनचा सिद्धांत शिकवणारे आहेत.
Comments
Post a Comment