हरहुन्नरी व्यक्ती P L deshpande
हरहुन्नरी व्यक्ती P L deshpande
ताळेबंदी आहे, त्यामुळे घरी रहा सुरक्षित रहा या तत्वाचे पालन करत
काय करायचे तर घरात असलेली पुस्तके वाचायला सुरुवात केली. मग हातात घेतल ते अनेक
प्रांतात स्वच्छंद संचार करणाऱ्या पु. ल. देशपांडे यांचे ‘मैत्र’ हे पुस्तक. या मध्ये पु. लं. च्या पूर्व
प्रकाशित निवडक लेखांचा संग्रह आहे. या पुस्तकातील लेख
फार उत्तम आहेत. मग ते ‘हमीद : एक श्रेष्ठ प्रबोधनकार’ असो की ‘सखे-सोबती गेले
पुढती’ असो वा इतर. या पुस्तकातील सर्व व्यक्तिरेखा
ह्या अत्यंत उत्तम रीतीने मांडल्या असून या व्यक्तिरेखांची स्वभाववैशिष्ट्ये, गुण, त्यांच्या कलेची महती, कामावरील- साहित्य-कलेवरील श्रद्धा यांचा वेधही पुलंनी घेतला आहे. ह्या मध्ये ‘शाहू महाराज : एक धिप्पाड माणूस’ हा लेख मला विशेष आवडला. या लेखातील वर्णन आजही तितकेच तंतोतंत लागू पडते. शाहू
महाराज हे आदर्श राजा तर होते पण व्यक्ति म्हणून त्यांचे मोठेपण यातून मला कळले.
एक आदर्श राजा कसा असावा हे छत्रपती शाहू महाराज, छत्रपती
शिवाजी महाराज यांना वाचल्यावरच कळत. महाराष्ट्रात कावड्यांची माळ घालणारे दोन
आदर्श राजे होऊन गेलेत ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज, आणि
छत्रपती शिवाजी महाराज. असे राजे ज्यानी रयतेच्या मनात असलेल्या लाचारीच्या
भावनेतून त्यांना वर काढले. त्यांच्यासारखे
बोटावर मोजण्या एवढेच राजे होऊन गेले बाकी फक्त राजेशाहीच्या उन्मादात जगले. आत्ता
सरंजामशाही जाऊन लोकशाही आली. परंतू पू. लांच्या मते सरंजामशाही नष्ट झाली नाही.
ते म्हणतात, ‘सरंजामशाही ही केवळ राज्यपद्धती नाही तर ती एक
वृत्ती आहे. आज लोकशाहीत देखील जेव्हा सत्तेची स्थाने जाती आणि वंशपरंपरेने काबीज
करण्याचा प्रयत्न दिसतो त्यावेळी मला तर सरंजामशाहीचाच मागल्या दराने प्रवेश
झालेला दिसायला लागतो. लोकप्रतिनिधीत्व गुणवत्तेच्या आधारावर मिळावे ना की जातीने,
वंशपरंपरेने जर हे लोकप्रतिनिधीत्व गुणवत्तेच्या आधारावर न मिळता
इतर आडवाट आणि चोर दरवाज्याने मिळते हे ध्यानात आले की आशा रीतीने सत्ता मिळवणारी
माणसे रयतेच्या हिताची काळजी वाहण्याचा नुसता देखावा करतील.’
आजची राजकीय परिस्थिती पाहता पू. लांची ही गोष्ट शंभर टक्के खरी वाटत.
जागतिक महामारीच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेची, आरोग्य
व्यवस्थेची जी दुरावस्था झाली त्यावर लक्ष केंद्रित न करता निवडणुका आणि एकमेकांवर
चिखलफेक करण्यात व्यस्त होते. देशाची परिस्थिती ही त्या रोमन साम्राज्यासारखी झाली
होती जे जळत होते आणि त्याचा सम्राट नेरो बासरी वाजवत होता. हे सम्राट म्हणजे
आपलेच लोकप्रतिनिधी. हे आपले लोकशाहीतील राजे आणि राण्या भाडोत्री गर्दी जमवून
स्वत:वर पुष्पवृषटया करून घेताना भुकेल्या जीवांचे आक्रोश आपल्या काय इतर
कोणाच्याही कानी पडू नयेत याची खबरदारी घेताना जास्त दिसत होते.
Comments
Post a Comment