धर्म आणि विज्ञान
धर्म आणि विज्ञान लंडनच्या बसेसवर 2009 मध्ये मोठ्या जाहिराती झळकवण्यात आल्या. जाहिरात अशी होती ‘ There is probably no God now stop worrying and enjoy your life ’ म्हणजे ‘ बहुतेक देव नाही त्यामुळे काळजी सोडा आणि मनसोक्त जगा. ’ लंडन मध्ये घडले ते आपल्या देशात घडलं असतं तर ? लोकांची प्रतिक्रिया काय आली असती ? जळी , स्थळी , काष्टी , पाषाणी देव शोधणाऱ्या संस्कृतीत देवाचं अस्तित्व नाकारणारा विचार रुचला असता? देव आणि धर्म ह्या दोन अतूट गोष्टी आहेत. देवा शिवाय धर्म नाही आणि धर्मा शिवाय देव. कोणत्या देवाची पूजा करतो त्यावरून त्याचा धर्म ठरतो जसं मुस्लिम अल्लाची, ख्रिश्चन येशू ची आणि हिंदू तर अनेक देविदेवतांची आराधना करतात . पण ज्यावेळी देवाचे अस्तित्व नाकारल्या जाते त्यावेळी धर्म आपोआप नाहीसा होतो . त्यामुळे धर्म हा मानवी मनाला कोणत्याही गोष्टीवर पुराव्याशिवाय विश्वास ठेवायला शिकवतो . जे मूळ मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहे. विज्ञानवाद हा मानवाचा मूळ स्वभाव आहे. देव कल्पनेचा शोधही यातूनच लागला. आदिमानवाला निसर्गात घडणाऱ्या घटनांचे योग्य ज्ञान नसल्यामुळे , त्यामागचा का